Thursday, June 18, 2009

पंतप्रधानांचा झरदारींना इशारा


भारताविरुद्ध कट शिजवण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर होता कामा नये, असा इशारा पंतप्रधानांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दिला.

येकाटेरिनबर्ग (रशिया)- भारताविरुद्ध घातपाताचे कट शिजवण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर होऊ देता कामा नये, असा निर्वाणीचा इशारा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दिला.

मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान व झरदारी यांची मंगळवारी रशियात भेट झाली.

पंतप्रधान व झरदारी यांच्यातील हस्तांदोलनाचे चित्रिकरण करण्यासाठी जमलेल्या टीव्ही प्रतिनिधींच्या उपस्थितीतच पंतप्रधानांनी झरदारी यांना हा इशारा दिला। यामुळे झरदारी काहीसे अवघडून गेल्याचे दिसत होते.


http://www.prahaar.in

No comments:

Post a Comment