मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित प्रकल्पाला सिडको मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याने मुंबईपाठोपाठ मेट्रो रेल्वेचा प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्नही प्रत्यक्षात साकारणार आहे.
नवी मुंबई- गगनाला भिडणा-या टोलेजंग इमारती आणि चकाचक रेल्वे स्थानके यामुळे अत्याधुनिक शहर म्हणून ‘पिंकसिटी’ नवी मुंबईची विशेष ओळख आहे. त्यातच मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित प्रकल्पाला सिडको मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याने नवी मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याच्या कामाला सिडकोने गती दिली आहे. २०१३ पर्यंत दिल्ली, मुंबईपाठोपाठ मेट्रो रेल्वेचा प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्नही प्रत्यक्षात साकारणार असल्याचा विश्वास सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सिडकोने दिल्ली रेल्वे कापरेरेशनचा सल्ला मागितला होता. त्यानुसार बेलापूर-खारघर-तळोजा कंळबोली मानसरोवर मार्गे २४ किलोमीटरच्या अंतरावर पहिली मेट्रो रेल्वे धावणार आहे. दुस-या टप्प्यात मानखुर्दपासून वाशी ते नवी मुंबई विमानतळ मार्गे १९ किलोमीटरचे अंतर असणार आहे. तिस-या टप्प्यात उरणमधील खारकोपर नंतर उलवे मार्गाने नवी मुंबई विमानतळ असे १४ किलोमीटरचे अंतर असणार आहे. या तीनही मार्गामुळे वाशी-तळोजा-उरण आणि नवी मुंबई विमानतळ एकत्रितरीत्या जोडले जाणार असून अवघ्या काही मिनिटांतच प्रवाशांना इच्छितस्थळ गाठणे सुलभ होईल. मेट्रो रेल्वेच्या प्रत्येक किलोमीटरमागे १४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
नवी मुंबईचा झपाट्याने होणारा विकास यामुळे रेल्वेवरील प्रवाशांचा ताण वाढतो आहे. यातच विमानतळ आल्याने त्यात आणखी भर पडणार आहे. यासाठी मेट्रो रेल्वेचा सवरेत्तम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास सिडकोचे अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला. नवी मुंबईची सध्याची लोकसंख्या २० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे शहराचा विकास आणि लोकसंख्या लक्षात घेता ‘आयआयटी’ ने केलेल्या सव्र्हेक्षणानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.www.prahaar.in
No comments:
Post a Comment