डॉ. पुष्कर शिकारखाने
प्रतिकारशक्तीच्या पेशी नको त्या ठिकाणी कमी केल्याने होणारी अॅलर्जी, संधिवात, बरेचसे त्वचाविकार यांपासूनही मुक्तता मिळते. मनात गोडवा भरपूर असला तरी साखर खायला मिळते म्हणजेच मधुमेह होत नाही. एकूणच शरीरात उत्साह, उर्मी, तेज यांची भरभराट होते.
मेंदूतील वाईट भावना किती प्रमाणात शरीराला इजा पोहोचवू शकतात, हे आपण कालच्या भागात पाहिलं. या उलट मनातील शांतता, प्रेम, आनंद, समाधान, सुख सुरक्षिततेची भावना निर्माण करतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो, स्नायू शिथील होतात, अन्न छान पचतं, शांत झोप लागते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते. बाहेरील जंतूंचा प्रतिकार चांगल्या प्रकारे केला जातो आणि जंतुसंसर्गाचा धोका खूप कमी होतो. प्रतिकारशक्तीच्या पेशी नको त्या ठिकाणी कमी केल्याने होणारी अॅलर्जी, संधिवात, बरेचसे त्वचाविकार यांपासूनही मुक्तता मिळते. मनात गोडवा भरपूर असला तरी साखर खायला मिळते म्हणजेच मधुमेह होत नाही. एकूणच शरीरात उत्साह, उर्मी, तेज यांची भरभराट होते.
असं म्हणतात uncertainty is the only certainty.. जगात अशाश्वतता हीच एकमेव शाश्वत गोष्ट आहे. तरीही तिचा मनावर परिणाम न होऊ देता जगातील चांगुलपणा, भव्यदिव्यता म्हणजेच ईश्वर तत्त्वावर विश्वास, श्रद्धा ठेवून आपली मन:शांती, आनंद कायम टिकवणं हेच आरोग्याचं मूळ आहे. आपला आनंद केवळ आपल्याच हातात आहे, कारण आनंद हा मानण्यात आहे. तो आपल्यापासून हिरावून नेतात, आपल्या अपेक्षा. आपण जगाकडे पाहून आणि आपल्या अनुभवांतून आनंदासाठी काही अटी घालून घेतो. उदा. मी एअरकंडिशन गाडीतून प्रवास केला तर सुखी, अन्यथा दु:खी. बरं या अटी काही मर्यादित नसतात. या अपेक्षा सतत वाढतच असतात. पण आपल्याला हे कळत नाही की या अनिश्चित जगात आपण पराधीन आहोत. गीत रामायणात गदिमा म्हणतात : दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा।
यामुळे आपला अपेक्षाभंग होण्याची शक्यताही ब-यापैकी असते आणि त्यामुळे आपल्याला दु:ख होतं. या दु:खाच्या भावनेतूनच राग, चिंता, काळजी, द्वेष अशा वाईट मन:स्थिती उगम पावतात. बरं क्षणिक दु:ख वाटणंही स्वाभाविक आहे. पण त्याच विचारात कुढत राहाणं आणि त्या पार्श्वभूमीवर आपली पुढील कृती, विचार ठरवणं फारच नुकसान करणारं ठरतं.
आपल्या मराठी भाषेतल्या काही म्हणी निरोगी राहण्यासाठी फारच उपयोगी आहेत. त्यातली पहिली म्हणजे ‘पदरी पडलं नी पवित्र झालं.’ याला इंग्रजीत unconditional acceptance म्हणतात. जोवर एखादी घटना घडत नाही किंवा नातेसंबंध जुळत नाही किंवा आपल्यावर परिस्थिती ओढवत नाही, तोपर्यंत आपल्यासाठी चांगलं काय ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. बरं ते सुद्धा चांगलं म्हणजे काय याची व्याख्या अस्पष्ट असल्याने, नुसतं चांगल्याची वाट पाहण्यात कधी कधी निर्णय फारच लांबणीवर पडतात. त्यामुळे संधी हातची निघून जाते. त्यामुळे एकदा आपण आपल्याला समाधानकारक असा प्रयत्न केला की, त्याचा जो काय परिणाम पुढे येईल तो आनंदाने स्वीकारण्यासाठी तयार असावं. समर्थानी म्हटलंच आहे, ‘आलीया भोगासी असावे सादर.’ उदा. खचाखच भरलेल्या लोकलमध्ये घामाच्या धारा लागलेल्या असताना ती बराच वेळ एकाच जागी उभी राहिली तर रेल्वेपासून लालूंपर्यंत, चुकलो आता ममता बॅनर्जीपर्यंत सर्वाना शिव्यांची लाखोली वाहण्यापेक्षा मोबाइलवर गाणी ऐकावीत (केवळ स्वत:पुरती), वा उद्या करायच्या कामांची मनात उजळणी करावी. त्यामुळे उकाडय़ापासून लक्ष वेगळीकडे जाईल. थोडक्यात म्हणजे डोक्यावर समंजसपणाचा बर्फ ठेवूनच जगावं.

No comments:
Post a Comment