
भाजप पुन्हा एकदा ‘यात्रा पॅटर्न’ राबविणार असून सूत्रे लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे राहणार अशी चिन्हे पक्षाच्या ‘चिंतन बैठकी’त दिसून आली।
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत झालेल्या पानिपतानंतर गलितगात्र झालेल्या भाजपमध्ये पुन्हा एकदा ‘यात्रा पॅटर्न’ राबवण्याचे संकेत देतानाच पक्षाचे ‘चिरतरुण नेते’ लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाची सूत्रे आपल्याच हाती राहणार, हेही रविवारी- पक्षाच्या ‘चिंतन बैठकी’च्या अखेरच्या दिवशी दाखवून दिले. सत्तेची स्वप्ने भंगल्यामुळे भाजपमध्ये उसळलेली सुंदोपसुंदी तसेच बंडाळी थोपवण्यास पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांना आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर अडवाणी यांनी रविवारी आक्रमक भूमिका घेत पक्षातील वाचाळ नेत्यांना सुनावले.‘पक्षाने आत्मपरीक्षण करण्यात कमी पडता कामा नये.. पण आत्मपरीक्षण म्हणजे परस्परांवर बोट दाखवणे नव्हे.. मतभेद असतील तर पक्षाच्या व्यासपीठावर मांडा, चव्हाटय़ावर नको’, अशा कानपिचक्या अडवाणींनी दिल्या.
संघटना बळकट करण्यासाठी केंद्रीय स्तरासह सर्व पातळ्यांवर सुधारणा करण्याची गरज आहे.. तरुण नेतृत्वदेखील हवेच’,‘चिंतन’ही त्यांनी मांडले. ‘पुन्हा यात्रा’राम रथ यात्रा, तसेच अन्य यात्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या अडवाणींनी पराभवाची कारणमीमांसा करण्याचे तसेच पक्षाला ‘नवसंजीवनी’ देण्यासाठी येत्या काही दिवसांत पुन्हा देशव्यापी यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. ‘पक्षकार्यकर्त्यांना पक्षातील संधी तसेच आपल्यासमोरील आव्हानांची जाणीव करून देण्यासाठी’ ही यात्रा असेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.‘हिंदुत्वाचा नारा’संघाने दिलेल्या कानपिचक्यांच्या पार्श्वभूमीवर अडवाणी यांनीही राजनाथ यांचीच री ओढत ‘भाजप हिंदुत्व तसेच संघाशी असलेली नाळ तोडणार नाही’, असे स्पष्ट केले. मात्र हिंदुत्वाची संकीर्ण परिभाषा आणि त्याची मुस्लिमविरोधी व्याख्या घातक ठरू शकेल’, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पक्षाला हवे नवे नेतृत्वनिवडणुकीदरम्यान काही त्रुटी राहिल्या अशी कबुली देतानाच आगामी २० वर्षाची गरज लक्षात घेत पक्षात तरुणांना संधी देण्याबरोबरच अन्य सुधारणाही कराव्या लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. पक्षात नव्या दमाचे नेते आहेत. मात्र त्यांना संधी मिळत नाही.. ती देण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘लोकलच्या डब्यातील मानसिकता’ सोडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.‘गिरे तो भी..’‘ निवडणुकीतील पराभव पक्षासाठी धक्कादायक असला तरी पक्षाचे पानिपत झालेले नाही.. निवडणुकीतील डाव्यांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी किंवा चौथ्या आघाडीच्या पराभवामुळे केवळ भाजपच काँग्रेसला पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे’, असा दावा अडवाणींनी यावेळी केला।
http://www.prahaar.in
No comments:
Post a Comment